पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- नदीतील पाण्याची मोटर चोरी करणाऱ्या तीन संशयितांना जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले असून संशयितांकडून चोरीची मोटर हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
लाखलगाव येथील तुषार पाटील बुवा निरगुडे हे शेती करतात. शेतीसाठी लाखलगाव शिवार गट नं. ६२६ मध्ये गोदावरी नदीपात्रात पाटबंधारे विभागाचे परवानगीने एक पाच हॉर्स पॉवरची जलपरी मोटर लावली होती. मात्र ती चोरीस गेली होती. पोलिसांनी सापळा रचून संशयित संदिप मधुकर मोरे (३२, रा. ओढा गाव), संतोष रमेश कापसे (३०, रा. ओढा गाव), बारकू कालू कापसे (३१, शिलापूर) यांना ताब्यात घेतले. या संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी गोदापात्रातून निरगुडे यांची मोटर चोरल्याची कबुली दिली. पोलिस निरिक्षक प्रवीण चव्हाण, उपनिरीक्षक जाधव, उपनिरीक्षक पाथरे, भूषण देवरे, हवालदार सुरेश नरवडे आदींनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा :
- Dhule News | अक्कलपाडा योजना म्हणजे धुळेकरांची शुद्ध फसवणूक : माजी आमदार अनिल गोटे यांची टीका
- Bhandara Accident : मुलांना पाणी पाजताना कारची धडक; पत्नी ठार, पतीसह मुले जखमी
- मोबाईल टॉवरची वसुली थांबवा ; नगरविकास विभागाचा फतवा
The post नदीतील पाण्याची मोटर चोरी करणारे संशयित जेरबंद appeared first on पुढारी.