नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा

Fraud

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जळगाव येथे प्लॉट विक्रीच्या बहाण्याने नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांनी ज्येष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात नाशिकच्या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. जळगावमध्ये मालमत्ता घेण्यासाठी टोकन व बुकिंगसाठी दिलेले चार लाख 95 हजार 390 रुपये परत न देता खोटे दस्तऐवज दिल्याची फिर्याद गोपालसिंग राजपूत (66, रा. पिंप्राळा, जळगाव) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील ठाणगाव (ता. सिन्नर) येथे गोपालसिंग राजपूत यांनी दोन प्लॉट घेण्यासाठी एकूण 4 लाख 95 हजार 390 रुपये धनादेश आणि रोख स्वरूपात संशयित प्रशांत शेंडे, योगेश शेंडे, राजेंद्र खैरनार व आणखी एका बांधकाम व्यावसायिकास दिले. मात्र, संशयित बांधकाम व्यावसायिकांनी सौदा पूर्ण करून खरेदीखत करून न देता खोटे दस्तऐवज खरे आहे, असे भासवून ती कागदपत्रे दिले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राजपूत यांनी पैसे परत मागितले. मात्र, संशयितांनी त्यांना दिले नाही. त्यामुळे चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा appeared first on पुढारी.