नाशिकमध्ये अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने संपविले जीवन 

अभ्यास तणावSTUDY TENTION

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- त्र्यंबकेश्वर येथील महिरवणी परिसरातील खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीने जीवन संपवले आहे. अभ्यासाच्या तणावातून तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

हश्रुली संजय जाधव (२०, रा. भिवंडी, जि. ठाणे, हल्ली रा. महिरवणी, जि. नाशिक) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हश्रुती हिने गुरुवारी (दि.२९) हॉस्टेलमधील खोलीत गळफास घेतल्याचे आढळून आली. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केला असता हश्रुलीने जीवन संपविण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात अभ्यासाच्या तणावामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हश्रुली हि परिसरातीलच एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

हेही वाचा –