सिडको : पुढारी वृत्तसेवा- शुभम पार्क परिसरात बेकायदा धारदार लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या एका पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी पवन परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की, शुभम पार्क येथील गौरव स्मृती अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये संशयित सुजय प्रकाश कुमावत (वय २८, शुभम पार्क सिडको) हा अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये धारदार शस्त्र घेऊन उभा आहे. पोलिसांनी सापळा असून त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पाचशे रुपये किंमतीची धारदार लोखंडी तलवार मिळून आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदरची कामगिरी अंबड गुन्हे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा –
- Shree Siddhivinayak Temple : सिद्धीविनायक मंदिरात मंगळवारी दागिन्यांचा लिलाव
- उन्मेष पाटील ‘मोदी का परिवार’ मधूनही बाहेर
The post नाशिकमध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्या एकाला अटक appeared first on पुढारी.