धक्कादायक ! बसच्या कूलेंटमधील तप्त पाणी अंगावर उडाल्याने चालकाचा मृत्यू

मृत्यू

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- धावती बस बंद पडली म्हणून चालक रेडीएटरमधील कूलेंट पाहत असताना त्यातील गरम पाणी अंगावर उडून गंभीररित्या भाजलेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील राहूड घाट शिवारात ही घटना घडली.

मुंबई-आग्रा महामार्गाने धुळे-नाशिक बस (एमएच ०६, बीडब्ल्यू १२३५) चालक संजय कृष्णा काकुलते (५२, रा. ओझर) हे १८ मार्च रोजी घेऊन चालले होते. राहूड घाट शिवारातील पवारवस्तीजवळ बस बंद पडली. तेव्हा काकुळते खाली उतरुन रेडीएटरमधील कूलेंटची तपासणी करीत असताना अचानक कूलेंटमधील गरम पाणी त्यांच्या अंगावर उडाल्याने त्यात त्याची मान, छाती, पाठ व दोन्ही हात गंभीररित्या भाजले होते. त्यांना तत्काळ नाशिकच्या खासगी दवाखान्यात उपचारासासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेबाबत चांदवड पोलिसात अकस्मात मृत्यूंची नोंद झाली असून हवालदार भाऊसाहेब गुळे हे चाैकशी करीत आहे.

हेही वाचा :

The post धक्कादायक ! बसच्या कूलेंटमधील तप्त पाणी अंगावर उडाल्याने चालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.