नाशिक शहरातील सातपूर परिसरात एका 19 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. हा तरुण सातरपूरमधील कामगार नगर भागातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. खून झालेला तरुण हा मूळचा नेपाळमधील असल्याची माहिती आहे. तो नाशिकमध्ये उदरनिर्वाहासाठी आला असल्याचे समजते. महेंद्र सिंग असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
धारधार शस्राने गळा चिरलेल्या अवस्थेतील त्याचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान पोलिस अधिक तपास करत आहेत.
The post नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची हत्या, शहर हादरलं appeared first on पुढारी.