
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर ठाकरे गटाने संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने शिवगर्जना अभियान सुरू केले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवारपासून (दि.२६) नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अभियानाची सुरुवात होणार आहे. अभियानांतर्गत रविवारी नाशिक व लासलगाव येथे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास शिवसेनानेते अनंत गिते, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दिंडोरीचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी दिली. नाशिकच्या सातपूर येथे पपया नर्सरीजवळ सौभाग्य लॉन्स येथे दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता मेळावा होईल. ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात व सातपूर येथे अभियानाच्या पूर्वतयारीसाठी बैठक झाली.
यावेळी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी, देवा जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. लासलगाव येथे रविवारी २६ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता मनकर्णिका हॉलमध्ये मेळावा होणार आहे.
हेही वाचा :
- टेक नंतर आता टेलिकॉम इंडस्ट्रीत सर्वात मोठी नोकरकपात, Ericsson मधून ८,५०० जणांना नारळ!
- चंद्रावरील पर्वताला गणितज्ज्ञ महिलेचे नाव
- नगर : रेल्वे उड्डाणपुलावर टॅ्रक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू
The post नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाचे शिवगर्जना अभियान appeared first on पुढारी.