नाशिक : अवैधरीत्या सोनोग्राफी यंत्र प्रकरणी गुरुवारी सुनावणी

सोनोग्राफी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोडमधील श्री बालाजी हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या आढळून आलेल्या सोनोग्राफी यंत्र प्रकरणी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यासह ११ जणांविरोधात गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व लिंगनिदान (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत नाशिकरोड न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. येत्या गुरुवारी (दि.१९) न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मनपाचे वैद्यकीय अधिकारी व बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भंडारी यांच्या मालकीच्या खासगी रुग्णालयात अनधिकृत सोनोग्राफी यंत्र आढळून आले होते. १६ डिसेंबरला नाशिकरोड येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये मनपा अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत अनधिकृत सोनोग्राफी मशीन आढळले होते. त्यानुसार डॉ. भंडारी दाम्पत्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत न्यायालयामार्फत गुन्हा दाखल झाला. नाशिकरोड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल झाला आहे. तसेच शुभम हॉस्पिटलचे तत्कालीन संचालक असलेले सहा डॉक्टर आणि हॉस्पिटल एका वषार्साठी भाडेतत्त्वावर घेणारे एक डॉक्टर अशा नऊ डॉक्टरांविरोधात हा खटला दाखल झाला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अवैधरीत्या सोनोग्राफी यंत्र प्रकरणी गुरुवारी सुनावणी appeared first on पुढारी.