नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने होणार कर्तबगार महिलांचा सन्मान

अहिल्यादेवी होळकर www.pudhari.news

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उष्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलाना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना 31 मे रोजी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन पुरस्काराकरीता लागणारे कागदपत्रे, नियम व अटी माहिती करुन घ्यावी. प्रत्येक गावातील कर्तबगार व इच्छुकमहिलांनी स्वता:च्या कार्याची माहिती, पूर्ण नावासह ग्रामपंचायत कार्यालयात जमा करुन सहभाग घेण्याचे आवाहन धनगर समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर. तालुकाध्यक्ष संतोष बिरे यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने होणार कर्तबगार महिलांचा सन्मान appeared first on पुढारी.