नाशिक : इगतपुरीतील मुंढेगाव स्फोटाने हादरले, जिंदाल कारखान्यात स्फोटानंतर आगीचे तांडव (व्हिडिओ)

आग www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा; इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यात रविवार, दि.1 सकाळी साडेअकराच्या सुमारास मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. नूतन वर्षारंभीच ही दुर्देवी घटना घडली आहे.

आगीने रौद्ररूप धारण केल्याने इगतपुरी तालुक्याच्या विविध भागातून दूरवरुनही आगीचे लोळ दिसून येत आहेत. या घटनेत मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इगतपुरी तालुक्यासह विविध नाशिकच्या भागातून अग्निशमन यंत्रणा सक्रिय काम करीत आहेत. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे. रुग्णवाहिका कंपनीत पोहोचल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या प्रकाराने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहेत.

आगीमुळे जीवित अथवा वित्तहानी किती प्रमाणात झाली हे अद्याप समजले नसले तरीही काही वेळात आगीचे कारण व एकूण नुकसान याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. कंपनीच्या परिसरात कामगार व नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली असून कंपनीच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : इगतपुरीतील मुंढेगाव स्फोटाने हादरले, जिंदाल कारखान्यात स्फोटानंतर आगीचे तांडव (व्हिडिओ) appeared first on पुढारी.