
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
कांदा कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आज शुक्रवार (दि. १०) चांदवड येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीने आंदोलन छेडले आहे.
समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला आहे. यामुळे महामार्ग ठप्प झाला आहे. शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
हेेही वाचा :
- लोणी : अर्थसंकल्पाचे‘पंचामृत’ समृद्धीचे, विकासाचे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- महिंद्रा समूह पुण्याबरोबरच नाशिकमध्येही गुंतवणूक करणार, आमदार फरांदे यांच्या प्रश्नावर उद्योगमंत्र्यांचे स्पष्टीकरण
- नाशिक : पिकाच्या नासडीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त
The post नाशिक : कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी आक्रमक, मुंबई आग्रा महामार्ग अडवला appeared first on पुढारी.