नाशिक : कांद्यासारखीच टोमॅटोची स्थिती, अडीच हजारांवरून चारशेवर

टोमॅटो

पिंपळगाव बसवंत : (जि. नाशिक)

कांद्यासारखीच टोमॅटोची परिस्थिती झाली असून, 15 दिवसांपूर्वी क्रेटला अडीच हजार रुपये असणारा भाव थेट चारशे रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिडले. गुरुवारी (दि. 24) पिंपळगाव बाजार समितीत जवळपास 75 हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. बाजारभाव किमान 51 रुपये, कमाल 401 रुपये व सरासरी 291 रुपये दर होता.

येथे व्यापाऱ्यांनी नाफेडच्या 2400 रुपयांपेक्षाही कमी भाव पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. केंद्र शासनाने नाफेड खरेदीसाठी २४१० रुपये क्विंटल भाव जाहीर केला आहे. मात्र पिंपळगाव बसवंत बाजार समितीत खूप कमी भाव पुकारला जात असताना शेतकरी संतप्त झाले. नाफेडचा किंवा नाफेड मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कोणत्याही कंपनीचा अधिकारी खरेदीला उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत त्यांना बोलाविण्याची मागणी केली. व्यापारी व नाफेडचे प्रतिनिधी यांच्यात भाव पुकारण्यावरून चढाओढ झाली असती व दोन पैसे निश्चितच शेतकऱ्यांना मिळाले असते. मात्र या ठिकाणी नाफेडचा एकही प्रतिनिधी नसल्याने व्यापाऱ्यांनी २४०० पेक्षाही कमी दर पुकारल्याने शेतकरी संतप्त झाले आणि लिलाव बंद पाडले

हेही वाचा :

The post नाशिक : कांद्यासारखीच टोमॅटोची स्थिती, अडीच हजारांवरून चारशेवर appeared first on पुढारी.