नाशिक कुंभनगरीत पंतप्रधान मोदींचे आगमन

ओझर विमानतळावर पंतप्रधान मोदी दाखल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक कुंभनगरीत दाखल झाले आहेत. नाशिकच्या ओझर विमानतळावरुन त्यांचे हेलिकॉप्टर शहरात पोहचले आहे. पंतप्रधान माेदी यांच्या हस्ते आज (दि. १२) नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद‌्घाटन होत आहे. नाशिककर पारंपारिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात मोदींचे स्वागत करत आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले. थोड्याच वेळात मोदी यांच्या रोड शोला प्रारंभ होणार. विमानतळ येथे मोदी यांचे राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरने निलीगिरी बाग हेलिपॅडकडे रवाना झाले.

The post नाशिक कुंभनगरीत पंतप्रधान मोदींचे आगमन appeared first on पुढारी.