नाशिक चाडेगाव गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

arrested

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- गावातील यात्रेच्या वर्गणीच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणी दोघा संशयितांना नाशिक रोड पोलिसांनी चाडेगाव येथून सकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान अटक केली. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नाशिक रोड पोलिस करीत आहेत. (Nashik Chadegaon Firing)

सूरज एकनाथ वाघ, सतीश सांगळे अशी अटक केलेल्या संशयतांची नावे आहेत. गुरुवारी (दि. 25) गोळीबाराची घटना घडली होती. चाडेगाव येथील मानकर मळ्यात राहणारे ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. मानकर घरी जात असताना सचिन मानकर याने ज्ञानेश्वर यास थांबण्यास सांगितले. तुझ्याकडे काम आहे, असे म्हणत सचिनने ज्ञानेश्वरला थांबण्यास सांगितले. त्यावेळी ज्ञानेश्वरने आपल्याला शक्य होणार नसल्याचे सांगितले. त्यावर लवकर परत येऊ, असे सांगत सचिन व त्याच्या साथीदारांनी ज्ञानेश्वरला गाडीत बसविले. त्यानंतर सर्वजण चाडेगाव फाट्यावर असलेल्या अमोल शिंदे याच्या हॉटेलवर गेले. या ठिकाणी जेवण केल्यानंतर सचिनने ज्ञानेश्वरकडे २० हजार रुपये मागितले. ज्ञानेश्वरने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वाद होऊन सचिनने त्याला मारहाण केली. घाबरून ज्ञानेश्वर हॉटेलबाहेर पळाल्यानंतर सचिन आणि त्याचे साथीदार मागून पळत आले. त्यापैकी दोघांनी ज्ञानेश्वरला धरून ठेवले. सचिनने कमरेला लावलेले पिस्तूल काढून पैसे देतो की ठार मारू, असे म्हणत दोन वेळा हवेत गोळीबार केला. त्यावेळी त्याच्या साथीदारांनीही ज्ञानेश्वरला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटून ज्ञानेश्वर पळून जाऊ लागल्यानंतर सचिनने त्याच्या दिशेने पिस्तुलातून दोनवेळा गोळ्या झाडल्याची घटना घडली होती.

हेही वाचा –