नाशिक : चारवर्षीय चिमुकल्याचा हौदात बुडून मृत्यू 

बुडून मृत्यू,www.pudhari.news

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथे सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या चारवर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला. हार्दिक गणेश पारवे असे या मुलाचे नाव आहे.

येथील रोहिदासनगरमधील हार्दिक गणेश पारवे (४) हा घराच्या परिसरात रविवारी (दि. १९) सायंकाळी 6 च्या सुमारास खेळत होता. येथील जुनी पोलिस चाळीच्या मागच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या हौदात तो पडला. परंतु ते कोणाच्याही लक्षात आले नाही. हार्दिक कुठे दिसत नाही म्हणून घरच्यांनी त्याचा उशिरा शोध घेतला. मात्र तो कुठेही सापडला नाही. रात्री 8 च्या सुमारास टॉर्चने (बॅटरी) पाण्याच्या हौदात पाहिले असता हार्दिक पाण्यात आढळला. त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी हार्दिकच्या घरच्यांनी एकच टाहो फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. मृत हार्दिकच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, आजी, काका, काकू असा परिवार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : चारवर्षीय चिमुकल्याचा हौदात बुडून मृत्यू  appeared first on पुढारी.