नाशिक : चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाला साप ; दैव बलवत्तर म्हणून बचावला शेतकरी

नाशिक, देवळा : पुढारी वृत्तसेवा

शेतात गावाकडे सापाचा सर्वत्र वावर पहायला मिळतो. अनेक वेळा दुचाकीत हे साप जाऊन बसतात. मात्र जेव्हा हे गाडी मालकाच्या नजरेस पडतं. तेव्हा त्याची अगदीच त्रेधा तीरपीठ ऊडून जाते. देवळा येथील तलाठी यांना चालू दुचाकीवर सर्प दंश झाल्याची घटना ताजी असतांना आज खामखेडा ता. देवळा येथे अशीच एक घटना घडली. यावेळी साप चक्क चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाल्याची घटना घडल्याने व दुसऱ्या वाहन चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

खामखेडा येथील शेतकरी विलास बाळू मोरे हे आपल्या ट्रक्टरने शेतातील सपाटी करण्यासाठी माती वाहण्याचे काम करीत होते.  दोन ते तीन ट्रीप टाकून झाल्यानंतर विलास यांचे चुलत बंधू ट्रक्टरकडे पाठीमागून आले असता त्यांना चालकाच्या शिटाखालून सापा सारखे दिसले. त्यांनी ट्रक्टर बंद करून जोराने आवाज देत खाली उतरायला लावले. सर्पमित्र नसल्याने इतर शेतकऱ्यांना बोलवत ट्रक्टर खाली उतरल्यावर पहिल्यानंतर त्यांनी चिमटयाच्या सहाय्याने साप बाहेर काढला असता नाग असल्याचे आढळले. या सापासोबतचा दोन ते तीन ट्रीप टाकून झाल्या होत्या. मात्र शिटाखाली काही भाग अडकला असल्याने या सापाला उलटून पुढच्या बाजूने जाता आले नाही.

यानंतर त्या सापाला एका डब्यात घालत जंगलात सोडण्यात आले. या संपूर्ण घटनेचा फोटो विलास मोरे व सुनिल मोरे यांनी काढले होते. दैव बलवत्तर म्हणून कुठलाही बाका प्रसंग ओढवला नसल्याचे कुटूंबाने म्हटले. हा प्रसंग अनेकांनी सोशल मीडियात शेअर केल्यावर अशा थरारक प्रसंगी चालक विलास मोरे, सुनिल मोरे, कारभारी मोरे, दिग्विजय मोरे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानचे सोशल मीडियावर कौतूक होताना दिसत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाला साप ; दैव बलवत्तर म्हणून बचावला शेतकरी appeared first on पुढारी.