नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर झाले आहे. यामध्ये राज्यातील आठशे पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील सहा अधिकारी, तर ३४ कर्मचारी अशा चाळीस पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये दोन उपायुक्त, एक उपविभागीय अधिकारी, दोन पोलिस निरीक्षकांसह एक उपनिरीक्षकांना पदक प्राप्त झाले. यासह सात सहायक उपनिरीक्षक, १९ हवालदार, पाच पोलिस नाईक, तीन पोलिस शिपायांचा समावेश आहे.
राज्य पोलिस दलातर्फे नुकतीच यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, पदकप्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील पदकप्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य चंद्रकांत गवळी, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त गीता चव्हाण, नाशिक ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी बाबूराव दडस यांचा समावेश आहे. यासह नाशिक शहरचे पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, नाशिक ग्रामीणचे निरीक्षक रघुनाथ शेगर, सत्यजित आमले यांचाही समावेश आहे. तसेच नाशिक शहरचे उपनिरीक्षक नारायणगीर गोसावी, नाशिक दहशतवादविरोधी पथकाचे सहायक उपनिरीक्षक विजय आहेर, नाशिक शहरचे विजय लभडे, विजय कडाळे, ललितकुमार केदारे, नाशिक ग्रामीणचे दिलीप पगार, पंढीरनाथ टोपले, सुहास छत्रे यांचाही समावेश आहे.
तसेच महाराष्ट्र पोलिस अकादमीतील अंमलदार संजय निफाडे, संजय पाटील, रंगराव ईशी, विठ्ठल खेडकर, नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयातील अंमलदार विनोद पाटील, नाशिक ग्रामीणचे प्रवीण काकड, कैलास मुंढे, अमोल घुगे, नितीन डावखर, योगेश पाटील यांचाही समावेश आहे. नाशिक शहरचे पोलिस अंमलदार मनोहर दत्तू नागरे, चंद्रकांत गवळी, शरद आहेर, बाळासाहेब मुर्तडक, सुरेश सोनवणे, आशा सोनवणे, काशीनाथ बागूल, महेश साळुंके, कैलास महाले, किशोर ठाकूर, महेश नांदुर्डीकर, अनिल लोंढे, नंदकुमार नांदुर्डीकर, दत्तात्रय खैरे, विशाल काठे, श्रीकांत कर्पे, विशाल जोशी हे महासंचालक पदकाचे मानकरी आहेत.
हेही वाचा –