
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
‘द केरला स्टोरी’ टॅक्स फ्री करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शुक्रवार दि. ५ मे रोजी सर्व भाषेत प्रदर्शित होणारा सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द केरला स्टोरी’ या सामाजिक चित्रपटास करमणूक करातून संपूर्ण माफी मिळणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
विपुल शहा निर्मित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची झलक (ट्रेलर) नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट उद्या शुक्रवार, दि. ५ मे २०२३ पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन असे दिसून येते की, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाचा विषय ‘लव्ह जिहाद’ वर आधारित असून राज्यातील सर्व घटकातील जनतेस सामाजिकदृष्ट्या ‘लव्ह जिहाद’ काय आहे. हे माहित होणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये विशेष करुन गोरगरीब मुलींना पैसा व विवाह अशी अनेक आमिष दाखवून त्यांची फसवणूक करुन विवाह झालेले आहेत. विवाहानंतर त्या मुलींना धर्मपरिवर्तन, मानसिक व शारीरिक त्रास देऊन सोडण्यात येते. त्यामुळे मुली व त्यांच्या सर्व कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त होण्याचे अनेक प्रकार राज्यातील विविध भागात घडले आहेत. अनेक फसगत झालेल्या हिंदू मुलींनी आत्महत्या केल्याचे प्रकार यापूर्वी राज्यात घडले आहेत. तर अनेक संघटनांनी वेळोवेळी आवाजही उठवला आहे. राज्यातील जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट पहावा व त्यापासून सामाजिक प्रबोधन व्हावे याकरीता राज्य शासनाकडून चित्रपटाचा करमणूक कर संपूर्णतः माफ करण्याच्या दृष्टीने आदेश व्हावेत अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना विनोद बळीराम मोठे, अशिष मालती सोनवले, श्रीराम निवृती डोबे, विनोद बळवंत मोठे, आरीष सोनवणे, स्वप्निल पाळदे, सागर सतीश देशमुख, सोनु अशोक नागरे, विनोद सु. थोरात, दीपक सुधाकर जाधव, सामु प्रापण दुपदल, दत्तात्रय मोढवे, संग्राम विदुमाधव फडके आदीसह युवती उपस्थित होते.
हेही वाचा:
- 11 मे नंतर महाराष्ट्रात नवं सरकार येणार? कायदे तज्ज्ञाचा मोठा दावा
- पिंपळनेर : ‘आपला दवाखाना’ चे आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते लोकार्पण
- लागिरं झालं जी फेम शितली आमची लाखात एक
The post नाशिक : 'द केरला स्टोरी' टॅक्स फ्री करा : सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on पुढारी.