
नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क
त्र्यंबकेश्वर परिसरात सामाजिक सलोखा, शांतता बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची टिका विरोधकांनी भाजपवर केली. त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या ठिकाणी वादग्रस्त घटना घडली त्या ठिकाणाची भाजप आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली.
यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. नितेश राणे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये नितेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.23) सकाळी 11 वाजता महाआरती करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथील घटनेची एसआयटी मार्फत चौकशी सुरु असून मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाआरतीनंतर नितेश राणे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा:
- काजू बोर्ड प्रस्ताव कोल्हापूरचा… मुख्यालय मुंबईला !
- नगर: ज्याचा फोन लागतो, त्याचाच पगार घ्या! आमदार नीलेश लंकेंनी अधिकार्यांना सुनावले
- ‘त्या’ वाक्यामुळे जयंत पाटील ईडीच्या रडारवर
The post नाशिक : नितेश राणे यांच्याकडून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाहणीनंतर महाआरती appeared first on पुढारी.