Nashik : रेल्वे अपघाताची चौकशी करणार – ना. भारती पवार

डॉ. भारती पवार,www.pudhari.news

निफाड : (जि.नाशिक) प्रतिनिधी

रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू हे अतिशय धक्कादायक गोष्ट असून या घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

निफाड तालुक्यातील कोटमगाव जवळ दुरुस्तीचे काम सुरू असताना रेल्वे अपघातात आज पहाटे चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. या अपघाताचे वृत्त समजतात डॉ. पवार यांनी घटनास्थळी तसेच निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन संबंधितांकडून घटनेची माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांनी ना. डॉ. पवार यांच्याकडे या अपघाताची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.

या अपघातामुळे रेल्वे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातात मरण पावलेले चारही कामगार हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्यापैकी तिघे तर घरातले एकुलते एक कर्ते कमावते होते. त्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत व्हावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते शंकरराव वाघ यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्याकडे केली.

हेही वाचा :

The post Nashik : रेल्वे अपघाताची चौकशी करणार - ना. भारती पवार appeared first on पुढारी.