नाशिक : ‘निमा पॉवर’ला भेट देण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून संकेत

nima www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

१९ ते २२ मेदरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या निमा पॉवर प्रदर्शनाला भेट देण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली.

प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास येणे न जमल्यास प्रदर्शन काळात केव्हाही भेट देणार असल्याचे ना. फडणवीस यांनी निमंत्रण स्वीकारताना सांगितले. निमा पॉवर प्रदर्शन उपसमितीचे चेअरमन राकेश पाटील यांनी ना. फडणवीस यांना प्रदर्शनाचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत व पालकमंत्री दादा भुसे यांनी यापूर्वीच प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. अशात त्यांचे नाशिकवर विशेष प्रेम असून, त्यांच्याकडे ऊर्जा खाते असल्याने ते आवर्जून प्रदर्शनाला भेट देतील. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल-इलेक्ट्राॅनिक क्लस्टरबाबत मोठी घोषणा करतील, अशी अपेक्षा बेळे यांच्यासह निमा पॉवर प्रदर्शनाचे चेअरमन मिलिंद राजपूत, सचिव राजेंद्र अहिरे यांच्यासह निमा पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : 'निमा पॉवर'ला भेट देण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून संकेत appeared first on पुढारी.