मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर

अॅड. प्रकाश आंबेडकर

जळगाव – ओबीसी आरक्षण बाबत आपल्याकडे सोलुशन आहे. मात्र नवीन सत्ता बदल झाल्यानंतर ते आपण सरकारला सांगू तोपर्यंत जरांगे पाटील व सरकारचे जे चालू आहे ते चालत राहिले पाहिजे. त्यामधून लोकांना जनजागृती होते. लोकांना सुद्धा आरक्षणाचे महत्त्व कळाले पाहिजे असे अॅड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर जळगाव येथे आले होते. त्यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. टिकाऊ आरक्षणाबद्दल नामदार गिरीश महाजन बोलत आहेत त्याविषयी विचारले असता आंबेडकर म्हणाले,  महाजनांनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे, अॅड जनरल कुंभकोणी यांनी ज्या पद्धतीने ही केस लढवली. त्यांच्याच सरकारने त्यांना पुढे का ठेवले नाही याचे उत्तर द्यावे. तुम्ही केस मध्ये लक्ष घालू नका हजर राहू नका असे आदेश का दिले गेले हे सांगावे. तर मग दीर्घकालीन टिकावू आरक्षण देऊ यावर आमचा विश्वास बसेल असा टोला त्यांनी महाजनांना लगावला.

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एक वर्षांपूर्वी युती झाली आहे. आघाडी होते की नाही हे पाहावे लागेल. आघाडीचा निर्णय होईल तो मान्य करावा लागेल. आघाडी होणार नसेल तर मग तसा आम्ही निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. आरएसएसच्या जोरावर मुख्यमंत्री ते पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांनी देशाचे तीन तेरा वाजवले अशी टीकाही त्यांनी केली.

एक व्यक्ती म्हणून विचारलं तर नरेंद्र मोदी हे देशाला प्रचंड धोका आहे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत व मोदी यांच्यामध्ये किती वेळा भेट झाली हे त्यांनी जाहीर करावे. मुख्यमंत्री व पंतप्रधान झाले त्यांनीच आरएसएसचे तीन तेरा वाजवण्याचे ठरविले आहे. आर एस एस समोर एक चॅलेंज आलेले आहे. वैदिक धर्म एक मेन अजिंडा तर दुसरीकडे अँटी रिझर्वेशन, अँटी मुस्लिम हे घेऊन चाललेले आहेत हे ते टिकणार आहेत का या अजिंड्यामुळे मोदी त्यांना चॅलेंज करीत आहेत का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. जे पक्ष फोडण्याची राजकारण भाजपा करीत आहे. तेच यापूर्वी काँग्रेसने केले आहे.  त्याची जळ आम्हालाही बसलेली आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या जाहीर सभेपूर्वी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.

हेही वाचा :

The post मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर appeared first on पुढारी.