भविष्यात केजरीवालही शरण जातील : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, अरविंद केजरीवाल www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा–  इडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ डिसेंबरला चाैकशीसाठी हजर राहण्याचे समन्स दिले आहे. त्यामुळे तेही भविष्यात त्यांना शरण जातील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी येथील सत्ता संपादन सभेत केले आहे. भाजपचा अजेंडा सुरु आहे की, २०२४ मध्ये नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधान पदासाठी दुसरा पर्याय राहणार नाही. तेव्हा आपणही महाराष्ट्रातील ४५ पैकी ३० जागाही भाजपला मिळणार नाही, असे उद्दीष्ट ठेऊन मतदारांपर्यंत पोहोचू, असे कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले.

आंबेडकर यांनी सभेत भाजपच्या भूमिकेचा समाचार घेताना शेतकरी, कामगार आणि बेरोजगारी आदी विषयावर करायच्या कामाची दिशा स्पष्ट केली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे असो की भाजप-शिंदे सरकार काळात मानधन, करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा कुणीच विचार केला नाही. सरकार हमीभाव जाहीर करते, पण व्यापारी त्या दराने कधीच खरेदी करत नाही. तुटवड्याच्या काळात लूट होणार नाही, याची जबाबदारी सरकारची असते. मात्र, हे सरकारच त्यात सहभागी होत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला. शेतकरी व कामगारांना न्याय देण्याचे काम ‘वंचित’च्या माध्यमातून करण्याचा विचार त्यांनी मांडला.

भाजप सरकार संविधान बदलणार, ही माझ्यासाठी आश्चर्याची बाब नाही, असे म्हणत, संवैधानिक व्यवस्था टिकली पाहिजे, यासाठी ओरिएंटेड काम करण्याची आवश्यकताही त्यांनी बोलून दाखवली. मोदी व भागवत यांना हिटलर संबोधत अंगरक्षकाची भीती बाळगणाऱ्या व्यक्तीची काय मानसिकता असेल, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा :

The post भविष्यात केजरीवालही शरण जातील : प्रकाश आंबेडकर appeared first on पुढारी.