
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ब्रह्मगिरीवरील हिरवळ वाचवणे आवश्यक आहे. हिरवळ वाचवली तरच गोदेची पवित्रता वाचेल. ब्रह्मगिरी व गोदेचे नाते जपले पाहिजे. सद्यस्थितीत गोदावरीत पाणी नाही तर मलमूत्र वाहत आहे, त्यामुळे गोदावरी मृतावस्थेत जाणार असल्याचा इशारा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिला.
नाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाच्या बैठकीनंतर सिंह पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले अवैध उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. सारूळ येथील अवैध उत्खननाने वनस्पती संकटात आल्या असून, भविष्यात पाणी प्रवाहात बाधा येईल, जैवविविधता नष्ट होईल, पर्यावरणीय प्रवाहसुद्धा नष्ट होण्याचा धोका त्यांनी वर्तवला. सह्याद्री पर्वतरांगेतील उत्खनन बंद झालेच पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. नागरिकांमध्ये नदी साक्षरतेची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, अभिनेता व अभियानदूत चिन्मय उदगीरकर उपस्थित होते.
हेही वाचा :
- बहुमत दिल्यास कर्नाटक नं. १ चे राज्य बनवू : अमित शहा
- Sanjay Raut: खासदार संजय राऊत पुन्हा अडचणीत; बीडमध्ये गुन्हा दाखल
- पुणे : राजगड, तोरणा किल्ल्यांवर पर्यटकांसाठी वॉकिंग प्लाझा
The post नाशिक : ब्रह्मगिरीवरील हिरवळ वाचवल्यास गोदा वाचेल - जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह appeared first on पुढारी.