नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

येथील प्रभाग क्रमांक २४ मधील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम करणाऱ्या कामगारांना शिविगाळ करून काम बंद पाडून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे मनसेचा पदाधिकारी अक्षय खांडरे याच्यासह पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. राजेंद्र गोरडे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ मध्ये हनुमान चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू असताना संशयित आदेश खांडरे, प्रतीक साळुंखे, यश निकम, चेतन शेलार, अक्षय खांडरे यांनी कामगारांना शिवीगाळ करत काम बंद पाडले होते. काम सुरू करायचे असेल, तर एक लाख रुपये देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय खांडरे हा मनसेचा पदाधिकारी आहे .पोलिस उपनिरीक्षक किरण शेवाळे अधिक तपास करत आहेत.

The post नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.