नाशिक महापालिकेची शोध मोहीम सुरू; 15 मुलांनी घेतले उपचार

Stray Dog Menace

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जेलराेड परिसरात पिसाळेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, त्याने सोमवारी (दि. 5) दोन बालकांवर हल्ला केला. गत 10 दिवसांत याच कुत्र्याने 12 ते 15 जणांवरा हल्ला (dog bite) करत जखमी केले आहे.  त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. यातील काही मुलांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

परिसरात शेफर्ड जातीच्या भुऱ्या रंगाच्या कुत्र्याने राजारामनगर येथे आयुष महंत (१२) व पठाण (10, रा. राजारामनगर, जेलरोड) या बालकांवर हल्ला (dog bite) केला यात दोघे बालक जखमी झाले आहेत. यातील आयुषला सामाजिक कार्यकर्ते संदीप नवसे यांनी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अद्वैत शिंदे (८), प्रणव खरोटे (८), ऋषिराज पुरोहित (८), आरोही संवत्सरकर (४) अशी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत. महापालिकेच्या बिटको आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, लटाकी चौफुली येथे मांस विक्रीची अनेक दुकाने आहेत. या दुकानांच्या आजूबाजूला रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे टोळके असते.

संख्येविषयी संभ्रमावस्था
जेलरोड परिसरात मागील काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत आहे. या कुत्र्यांची संख्या नेमकी किती आहे, याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम आहे. महापालिकेचे पथकही या संख्येविषयी माहिती घेत आहे.

The post नाशिक महापालिकेची शोध मोहीम सुरू; 15 मुलांनी घेतले उपचार appeared first on पुढारी.