
नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
वणी-पिंपळगाव मार्गावर सोमवारी (दि.८) साडेचारच्या सुमारास पिकअप गाडीने कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने ट्रॅक्टर चालकाच्या बाजुला बसलेला एक जण खाली पडून ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.८) साडेचारच्या सुमारास वणी- पिंपळगाव मार्गावर साक्रेश्वरी फाट्यानजीक वणीकडून पिंपळगावच्या दिशेने कांद्याची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात असतांना त्यास पाठीमागुन पीकअप वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टर चालकाच्या सोबत बसलेला बेबीलाल सावळीराम पवार (वय ३३, रा.भोवती तालुका कळवण) हा खाली पडुन गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्युमुखी पडला. आकस्मिक अपघाताची वणी पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु आहे. वणी पिंपळगाव रस्त्यावर वारंवार अपघात सत्र सुरूच आहे. या रस्त्यावर झालेल्या अपघातात पिकअप वाहनामुळे अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत. जानेवारी-२०२३ पासून येथील रस्त्यावर २४ लोकांना जीव गमवावा लागला आहे. वणी-कळवण, वणी-पिंपळगाव, वणी-सापुतारा रस्त्यावरील अपघातात पिकअप वाहनामुळेच हा अपघात घडला आहे. याबाबत प्रादेशिक परीवहन मंडळाने चौकशी करून यावर उपाय योजना आखणे, कारवाई करणे अपेक्षित आहे.
हेही वाचा:
- ओडिशातील जंगलात चकमक, तीन नक्षलींचा खात्मा
- देहूगाव : पालखी मार्गावर स्वच्छतागृह उभारा; उपजिल्हाधिकारी संजय आसवले यांच्या अधिकार्यांना सूचना
- आकुर्डी : उन्हाळी सुट्यांत बालचमू उडवतोय धमाल !
The post नाशिक : वणी पिंपळगाव रस्त्यावर ट्रॅक्टरला पिकअपची धडक; एक ठार appeared first on पुढारी.