नाशिक : शहरात घरफोडी करणारे दोघे चोरटे जेरबंद

घरफोडी www.pudhari.news

नाशिक : शहरासह उपनगरांमध्ये शहरात घरफोड्या, जबरी चोऱ्या करणाऱ्या दोन संशयितांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. शैलेश संपत मुर्तडक (३०, रा. अवधुतवाडी, पंचवटी) आणि राहुल चिंतामण पगारे (३०, रा. लाटेनगर, हिरावाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून टीव्ही, लॅपटॉपसह एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

गुन्हे युनिट एकचे अंमलदार प्रवीण वाघमारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपनिरीक्षक विष्णू उगले, अंमलदार प्रदीप म्हसदे, नाझिमखान पठाण, आसिफ तांबोळी, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके आणि मुक्तार शेख यांनी अवधुत वाडी परिसरात सापळा रचून संशयित मुर्तडक आणि पगारे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी पंचवटी आणि आडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांची कबुली दिली.

हेही वाचा : 

The post नाशिक : शहरात घरफोडी करणारे दोघे चोरटे जेरबंद appeared first on पुढारी.