नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची नवी तारीख जाहीर

mlc election

सिडको : पुढारी वृत्तसेवा– निवडणुक आयोगाने पुढे ढकलेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर केला आहे. यात नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे.

यात ७ जुनला अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर १२ जुन रोजी अर्ज माघारीची तारीख आहे.  २६ जून रोजी मतदान होणार आहे तर १ जुलै रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

निवडणुक आयोगाने प्रथम मे -जून महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. शिक्षकांना सुटी असल्याने निवडणुक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. अखेर निवडणुक आयोगाने नवीन निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे.