
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदा शिवजयंतीला अशोक स्तंभ मित्रमंडळातर्फे चौकात साकारण्यात आलेल्या ६१ फुटी उंच शिवमूर्तीची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. १९ फेब्रुवारीला नाशिकमध्ये जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. १९ फेब्रुवारीला नाशिकमध्ये जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरामध्ये अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाकडून ६१ फूट उंच व २२ फूट घेर, तसेच चार टन वजनाची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारण्यात आली होती.
मूर्ती बघण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. नाशिकसह ग्रामीण भाग तसेच उत्तर महाराष्ट्रातून मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रेमी अशोक स्तंभावर आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून मूर्तीचे काम सुरू होते. अशाके स्तंभावर मूर्ती बसवण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागला. शिवजयंतीच्या दिवशी ५१ जोडप्यांच्या उपस्थितीत मूर्तीचे पूजन झाले. छत्रपती सेनेकडून जयंतीच्या दिवशी कवड्यांची माळ मूर्तीसाठी समर्पित केली होती. महाराष्ट्रात प्रथमच ६१ फूट मूर्ती साकारली गेली. त्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डने घेतली.
संस्थेचे अध्यक्ष नीलम यांनी अशोक स्तंभ मित्रमंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्याकडे सर्वांत उंच शिवाजी महाराजांची मूर्ती साकारल्याचे प्रमाणपत्र सादर केले. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील शिवमूर्तीचे दर्शन घेत संकल्पनेचे कौतुक केले. मूर्ती बनविण्याचे काम हे ऑक्टोबर २०२२ पासून चालू होते. मंडळाचे यंदाचे अध्यक्ष अक्षय दिगंबर भडांगे, उपाध्यक्ष स्वप्नील दिघोळे, सचिव सूरज कासार, उपसचिव अक्षय दवांडे, खजिनदार वैभव वीर, उपखजिनदार आनंद केदार, कार्यकारी सदस्य दर्शन घुले, परेश पाटील, बॉबी नेवारे, करण परदेशी, हेरंभ कुलकर्णी, मयूर थोरात, हर्षद निकम, मकरंद देशमुख आदींनी संकल्पना साकारण्यासाठी प्रयत्न केले.
हेही वाचा :
- काय सांगता, ‘या’ देशांना स्वतःचा विमानतळच नाही
- पुणे : बेल्हेजवळ टेम्पो- पिकअपची धडक ; अपघातात तिघांचा मृत्यू
- पिंपरी : पोलिसांचे मायक्रो प्लॅनिंग; गोंधळ घालण्याच्या तयारीत असलेले 128 जण ताब्यात
The post नाशिक : शिवरायांच्या ६१ फूट मूर्तीची वंडर बुकमध्ये नोंद appeared first on पुढारी.