दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ

दूध,www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा

भारतातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात होत आहे. या निर्यातीत सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. अशातच दुग्धजन्य पदार्थांत मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्याची माहिती अपेडाच्या आकडेवारीवरून दिसून येते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्यातीमधून एप्रिल २२ ते नोव्हेंबर २२ पर्यंत देशाला ३३२५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. तर गेल्या वर्षी एप्रिल २१ ते नोव्हेंबर २२ या काळामध्ये देशाला २३३३ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुग्धजन्य पदार्थांची निर्यात ४२ टक्क्यांनी वाढून परकीय चलनामध्ये ९९२ कोटी रुपयांची भरघोस वृद्धी झाली आहे. या निर्यातीतून शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

देशातील उत्पादनांना परदेशात मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. परदेशातील लोकांची भारतीय फळांना आणि भाज्यांना मोठी मागणी आहे. फळे आणि भाज्यासंह दुग्धजन्य पदार्थ यांना मोठी मागणी आहे. एप्रिल २२ ते नोव्हेंबर २२ या काळात १ लाख १२ हजार ७५६ मेट्रिक टन दुग्धजन्य पदार्थ निर्यात होऊन ३३२५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. निर्यातीच्या संदर्भातील आकडेवारी अपेडाने जाहीर केली आहे.

या प्रमुख देशांत होते निर्यात

बांगलादेश, युनायटेड अरब्स, सौदी अरब, यूएसए,

भुताण, सिंगापूर, कतार, इंडोनेशिया, ओमान

दुग्धजन्य पदार्थांची निर्यात वाढणे ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे. निर्यातीने देशाला परकीय चलन मिळते व वित्तीय तूट कमी होण्यात हातभार लागतो. याशिवाय देशात दुधाची मागणी वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी चांगला दर मिळतोय.

-शंतनू पाटील, संचालक कान्हा डेअरी, लासलगाव

मागील ५ वर्षांचा दुग्धजन्य पदार्थ निर्यात आकडेवारी

सन २०१७-१८-११९६ कोटी

सन २०१८-१९-२४२३ कोटी

सन २०१९-२०-१३४१ कोटी

सन २०२०-२१- १४९१ कोटी

सन २०२१-२२- २९२८ कोटी

हेही वाचा :

The post दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.