नाशिक : समोरील वाहनाला वाचवताना बसचा अपघात

Accident सोग्रस

चांदवड : पुढारी वृत्तसेवातालुक्यातील सोग्रस येथील मुंबई आग्रा महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या यावल आगाराच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहकासह इतर पाच प्रवाशी गंभीर जखमी झाले. जखमींवर तातडीने चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.

यावल आगाराची बस (क्र. एम. एच. २०, बी. एल. २६५६) आगारातून सोमवार (दि.३) रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नाशिकला निघाली होती. मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या बसचा सोग्रस (ता.चांदवड) येथे दुपारी १ वाजता भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात बसचा पुढील बाजूचा पूर्णतः चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात बसमधील वाहकासह दोन जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना सोग्रसचे सरपंच भास्कर गांगुर्डे, नितीन गांगुर्डे आदीसह इतर नागरिकांनी सहकार्य करीत तत्काळ उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात हलवले. यावेळी अपघातग्रस्तांवर उपचार करण्यात आले. बस अपघातावेळी महामार्गावरील दुभाजकावर जाऊन आदळली होती. यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक तांगड, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कुशारे, पोलीस नाईक अमित सानप यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.

जखमींचे नावे

वाहक अतुल अशोक कोळी (४४, किनगाव, यावल); अभिनंदन नंदकिशोर जोशी (४०, मालेगाव); मंगेश भगवान भोई (४४, नाशिक); हेमंत पुंडलीक नंदन (२६, ताराबाद); रत्नाबाई संजय खैरे (४७, रा. चिंचवे, मालेगाव), डॉ. रोहिणी शिंदे (२९, अमृतधाम नाशिक).

हेही वाचा –