
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्थानबद्ध केले आहे. गणेश ऊर्फ छकुल्या मधुकर वाघमारे (२२, रा. गोरेवाडी, नाशिकरोड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
गणेशविरोधात खुनाचा प्रयत्न, मारहाण, दहशत करणे, बेकायदेशीर जमावात राहणे, दंगा, जबरी चोरी, तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. गणेश यास नोव्हेंबर २०२० मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपार असतानाही गणेशने गृन्हे करीत दहशत करण्याचा प्रयत्न केला. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शहरात वास्तव्य करीत तडीपारी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे गणेशवर एम. पी. डी. ए. कायद्यानुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलिस आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार गणेशला स्थानबद्ध करण्यात आले आहे. भविष्यात सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई होणार असल्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
हेही वाचा:
- माझ्या नवऱ्याची बायको फेम ईशाचा नाद खुळा; सोफ्यावर हॉट अन्…
- दम्याचा त्रास? नका करू दुर्लक्ष!
- Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिनने केला शब्द पूर्ण; म्हणाला होता, ‘मी पुन्हा भेट वस्तू घेऊन येईन’
The post नाशिक : सराईत छकुल्या स्थानबद्ध appeared first on पुढारी.