नाशिक : हॉटेल बंद हाेईल म्हणून केली घाई, दुचाकी बसवर आदळून दोन विद्यार्थी ठार

अपघात,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भरधाव दुचाकीची एसटी बसला धडक बसून झालेल्या अपघातात संदीप फाऊंडेशनमध्ये शिक्षण घेणारे अभियांत्रिकीचे दाेघे विद्यार्थी ठार झाले तर तिसरा विद्यार्थी जबर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात गुरूवारी रात्री दाेनच्या सुमारास ठक्कर बझार समाेरील धाडीवाल हाॅस्पिटलसमाेर घडला. या प्रकरणी मृतांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते.

शुभम प्रशांत साेनवणे (२१, रा. व्हीआयपी काॅलनी, भुसावळ) व शुभम संताेष काेकाटे (२१, रा. महाराणा प्रताप चाैक, सिडकाे) अशी मृतांची नावे आहेत. या दाेघांसह त्यांचा मित्र मध्यरात्री दुचाकीवरून भरधाव सिडकाेतून त्र्यंबकराेडकडे येत हाेते. ते जिल्हा रुग्णालया जवळ आले असता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धावत्या बसच्या टूलबाॅक्सवर पाठीमागून जाऊन आदळले. त्यात ते गंभीर जखमी हाेऊन दाेघांचा मृत्यू झाला. माहिती कळताच सरकारवाडा पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहायक निरीक्षक खेरणार व अंमलदार दाखल झाले. त्यांनी तिघाही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. यातील तिसऱ्या जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दाेन्ही शुभम कुटुंबात एकुलते एक हाेते. शुभम साेनवणे हा शिक्षणसाठी नाशिकमध्ये राहत हाेता.

हॉटेल बंद हाेईल म्हणून केली घाई

तिघे मित्र हॉटेलवर जेवनासाठी जात होते. हॉटेल बंद होईल आणि जेवन मिळणार नाही. म्हणून त्यांनी दुचाकी अत्यंत वेगात घेतली. मात्र, नियंत्रण सुटल्याने दुचाकी बसच्या टूलबाॅक्सवर पाठीमागून जाऊन आदळली.

हेही वाचा :

The post नाशिक : हॉटेल बंद हाेईल म्हणून केली घाई, दुचाकी बसवर आदळून दोन विद्यार्थी ठार appeared first on पुढारी.