
नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथील दोन मुलांसह पित्याला १३ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून जखमी केल्याची गंभीर घटना घडली आहे. विशेष म्हणजे यातील जखमी चंद्रकांत वायाळ, योगेश वायाळ, भीमा ढगे हे आदल्या दिवशी या टोळक्याविरुद्ध घोटी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता घोटी पोलिसांनी गुन्हा घडल्यावर तक्रार घेऊ, असा अजब सल्ला दिल्याचा आरोप वायाळ या शेतकरी कुटुंबाने केला आहे.
बारशिंगवे येथील योगेश वायाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास सारे कुटुंब घरात असताना अचानक घरावर दगड-गोटे पडले. सर्व जण बाहेर आले तेव्हा सोपान घाने, शत्रुघ्न घाने, भास्कर घाने, उमेश घाने, सचिन घाने, पंढरी घाने, नवनाथ घाने, सोमनाथ घाने, रवींद्र घाने, एकनाथ घाने, तुकाराम घाने, प्रवीण घाने, नामदेव घाने हे घराबाहेर उभे होते. त्यांनी शिवीगाळ करत आपणासह वडील व मावसभावास लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. आई संगीताबाई व पत्नीलाही त्यांनी मारहाण केली. या टोळक्याने घराची मोडतोड केली. घोटी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालय आणि नंतर तेथून नाशिकला जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथे उपचार घेऊन वायाळ कुटुंबाने बुधवारी फिर्याद दिली आहे.
हेही वाचा :
- कोल्हापूर : अवचितवाडीत पोल्ट्री व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे : मिनी विधानसभेला मुहूर्त मिळेना !
- धक्कादायक ! पुण्यात पती- पत्नीच्या वादात बापानेच केला पोटच्या मुलीचा खून
The post नाशिक : १३ जणांच्या टोळक्याकडून मुलांसह पित्याला बेदम मारहाण appeared first on पुढारी.