नैताळे यात्रोत्सवाची महाआरतीने सांगता

यात्रा सांगता www.pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- नाशिक-छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नैताळे (ता. निफाड) येथील श्री मतोबा महाराजांची महाआरतीने सांगता झाली. २५ जानेवारीपासून यात्रेला सुरुवात झाली होती. सलग १८ दिवस यात्रा भरली. रविवारी (दि. ११ )सायंकाळी ७ वाजता हेक्झाकाॅन न्यूट्रिशयन कंपनीचे मुख्य व्यवस्थापक तुषार कातकाडे व नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डाॅ. हर्षदा सानप यांच्या हस्ते महाआरती होऊन यात्रेची सांगता करण्यात आली. यात्राकाळात सुमारे १२ लाखांहून अधिक भाविकांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

ट्रस्टने मंदिर परिसरात भाविकांसाठी दोन टँकरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी साफसफाई राखली. नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष आरोग्य पथक सज्ज होते. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस उपअधीक्षक नीलेश पालवे व पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तीन अधिकारी व ५० पोलिस कर्मचारी तैनात होते.

महाराष्ट्रातील नामवंत तमाशा मंडळांनी हजेरी लावली. पाळणे आणि गृहोपयोगी साहित्य विक्रीतून लक्षणीय उलाढाल झाली. यात्रेसाठी श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव बोरागुडे यांसह ट्रस्टींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

The post नैताळे यात्रोत्सवाची महाआरतीने सांगता appeared first on पुढारी.