मेशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; उपसरपंच पदी सतीश बोरसे

देवळा ; मेशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेना युवा सेनेचे तालुका उपप्रमुख (उबाठा गटाचे) सतीश बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संपूर्ण देवळा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मेशी गामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अटीतटीच्या झालेल्या लढतीत थेट सरपंच पदी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख बापूसाहेब शांताराम जाधव हे सर्वाधिक १ हजार १३९ मते मिळवून विजयी झाले आहेत.

शुक्रवारी (दि. १) सकाळी ११ वाजता उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी शिवसेनेचे युवा (उबाठा गट) तालुका उपप्रमुख सतिष अंबादास बोरसे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिंदे यांनी बोरसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी योगेश चव्हाण, शिल्पा अहिरे, समाधान गरुड, द्वारकाबाई शिरसा , शाहू शिरसाठ, मनीषा कुवर, गोरख बोरसे, तुषार शिरसाठ, अनिता शिरसाट, दगूबाई शिरसाट, लीलाबाई चव्हाण आदी नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
बोरसे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला.

हेही वाचा :

The post मेशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; उपसरपंच पदी सतीश बोरसे appeared first on पुढारी.