सातपूर : अशोकनगर परिसरातील विद्युत तारेला अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्न करत असताना तरुण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम जाधव (२४, विश्वास नगर, अशोक नगर) हा तारलेला अडकलेली पतंग काढत असताना अचानक शॉक लागल्याने ५० टक्के भाजला. शुभमची प्रकृती गंभीर असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सातपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी अधिक तपास करत आहे.
The post पतंग काढताना शॉक लागून युवक गंभीर जखमी appeared first on पुढारी.