पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
श्रीराम जन्मोत्सावातील चैत्र शुद्ध एकादशीला निघणाऱ्या रथोत्सवात नाशिककर मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभागी होतात. नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यंदाचा रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ५ वाजता श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती रथात विराजमान करून या रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
भोर पंचायत समितीच्या उपअभियंत्याला 70 हजारांची …
श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी सवाई माधवराव पेशवे यांना आरोग्यप्राप्ती व्हावी यासाठी नवस केला होता. नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रभू श्रीरामाला रामरथ अर्पण केला. या रथाची देखभालीचा जबाबदारी त्यांचे मामा श्रीमंत सरदार रास्ते यांच्याकडे दिली होती. त्यांनी रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापना केली. त्यात व्यायामप्रेमी घडविले. तेच व्यायामप्रेमी पुढे रथ ओढण्याची जबाबदारी पार पाडू लागले. आजतागायत रथ ओढण्याची जबाबदारी रास्ते आखाडा तालीम संघाकडेच आहे.
श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथे मंदिरात असलेल्या पाषाणाच्या मूर्ती हलविणे शक्य नसल्यामुळे श्रीरामचंद्रांच्या बहुमूर्ती पालखीतून अगोदर गरुडरथातून पुढे आणून दोन्ही रथ समांतर आणले जाते. गरुडरथातील मूर्ती रामरथात आणल्या जातात. मान्यवरांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर रथोत्सव सुरू होतो. या रथोत्सवात सनई चौघडा, बॅण्ड पथक, गरुडरथ, रामरथाकडे मुख करून उलट्या दिशेने चालणारे मानकरी बुवा, रामरथ अशी हा रथोत्सव बघण्यासाठी आणि दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होत असते. पूर्वी रथाचा मार्ग हा कच्चा होता. वाघाडी नाल्यातून रथ नेत असताना रथ गाळात रुतला, तो काढण्यासाठी पाथरवट समाजाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. तेव्हापासून पाथवट समाजालासुद्धा रथ ओढण्याचा मान मिळाला.
गरुडरथ ओढण्याचा मान अहिल्याराम व्यायाम शाळेला आहे. दोन्ही रथ नाड्याच्या साह्याने ओढलेले जातात. रथाच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला जाड नाडे बांधलेले असतात. उताराला मागील नाड्यांनी रथाचे नियंत्रण केले जाते. रथ वळविण्यासाठी धुरीचा वापर केला जातो. धुरी म्हणजे लाकडाचा मोठा वासा असतो. त्यासाठी प्रशिक्षित धुरंधर नेमले जातात. ते आपले कसब पणाला लावून रथाला दिशा देण्याचे काम करतात.
श्री काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांपैकी एका पुजाऱ्याला दरवर्षी या श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी पूजेचा मान असतो. त्याला मानकरी बुवा म्हटले जाते. हे मानकरी बुवा चैत्र प्रतिपदा ते नवमीपर्यंत व्रत धारण करतात. हे बुवा रथोत्सवाला श्रीरामाच्या रथापुढे मुख करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करीत असतात.
असा असणार रथोत्सवाचा मार्ग
दोन्ही रथ काळाराम मंदिर पूर्वदरवाजा, नागचौक, लक्ष्मणझुला पूल, काट्यामारुती चौक, गणेशवाडी रोड, मरिमाता मंदिर, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण येथे रामरथ थांबतो. गरुड गाडगे महाराज पुलाखालून नेहरू चौक, चांदवडकर गल्ली, धुमाळ पॉइंट, मेनरोड, बोहरपट्टी, जुना सरकार वाडा, सराफ बाजार, कापड बाजार, बालाजी कोट, कपूरथळा मैदान, गाडगे महाराज पूल, म्हसोबा पटांगण येथे आल्यानंतर पुढे गरुडरथ आणि मागे रामरथ गंगाघाट मार्गे रामकुंड येथे नेण्यात येतो. तेथे अवभृत स्नान व पूजा केल्यानंतर रथ परतीच्या मार्गे परशराम पुरिया रोडने, शनिचौक, हनुमान चौक, काळाराम मंदिर पूर्वदरवाजाकडे नेण्यात येतो.
हेही वाचा:
- पोलिस शिपायाला मारहाण; येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Bribe News Dhule : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या महिला ग्रामसेविकेवर गुन्हा दाखल
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा
The post पेशवेकालीन श्रीराम रथयात्रेची तयारी पूर्ण; दिमाखदार सोहळा appeared first on पुढारी.