
नाशिक : पुढारी वृत्तसेवा-आडगाव पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षकास शिवीगाळ करणाऱ्यास न्यायालयाने सहा महिन्यांचा साधा कारावास व ६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ७ मार्च २०१७ रोजी रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. जितेंद्र निंबा पाटील (रा. आडगाव शिवार) असे आरोपीचे नाव आहे.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक काकासो पाटील हे पोलिस ठाण्यात सेवा बजावत असताना जितेंद्र पाटील याने पोलिस ठाण्यात येऊन गोंधळ घातला. पाटील यांना शिवीगाळ करीत इतर पोलिसांना शिवीगाळ, मारहाण करीत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात जितेंद्र विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक पोलिस उपनिरीक्षक ए. पी. महिरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. अपर्णा पाटील यांनी युक्तिवाद केला. जितेंद्र विरोधात गुन्हा शाबित झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. लोकवाणी यांनी त्यास शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार प्रेरणा अंबादे, सोमनाथ शिंदे, एस. टी. बहिरम यांनी कामकाज पाहिले.
हेही वाचा :
- Ankita Lokhande : ‘वीर सावरकर’ नंतर अंकिता लोखंडे आम्रपाली चित्रपटात !
- उमेदवार मालमत्ता घोषणेबाबत सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी, “प्रत्येक जंगम मालमत्ता …”
- Gold Price Today | सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर
The post पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्यास सहा महिने कारावास appeared first on पुढारी.