बचत गट मेळाव्यानिमित्त पोखरी गावात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम

नांदगाव,www.pudhari.news

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा – बचत गट मेळाव्यानिमित्त पोखरी गावात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाल्या होत्या.

हळदी कुंकू समारंभाचे आयोजन पोखरीचे सरपंच ॲड. किरण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य शितल गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अंजुम कांदे यांनी पोखरी गावातील महिलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत महिलांच्या आरोग्याच्या व वेगवेगळ्या समस्या जाणून घेतल्या.

न्यायडोंगरी गटातील पोखरी गावात महिलांसाठी प्रथमच असा कार्यक्रम पार असल्याने त्यांनी सरपंच ॲड किरण गायकवाड यांचे अभिनंदन केले. तसेच पोखरी गावात बचत गट भवन उभारन्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. महिलांना आपल्या जीवनात सक्षमपणे उभे राहण्यासाठी व्यवसाय सुरू करणे गावातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी शासनाच्या विविध योजना सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

गावातील महिलांनी पहिल्यांदा आमदार साहेबांच्या पत्नी गावात येऊन आमच्या सोबत गप्पागोष्टी करून हळदी कुंकवाचा कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल अंजुम कांदे यांचे आभार मानले. सर्व महिलांनी अंजुम कांदे यांना उखाणा घेण्यासाठी आग्रह धरला असता त्यांनी देखील उखाणा घेतला. कार्यक्रमासाठी बबनबाई माळी, रंजना वाघमोडे ग्रामपंचायत सदस्या, बचत गटाच्या सलमा शेख, रुपाली सापटे तसेच आशा सेविका मंदा गायकवाड, मेघा गायकवाड यांच्यासह गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा :

The post बचत गट मेळाव्यानिमित्त पोखरी गावात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम appeared first on पुढारी.