बनावट नंबर प्लेट लावून पिकअपचा वापर, चालकाविरोधात गुन्हा

बनावट नंबर प्लेट वापरुन वाहन चालवणारा पकडला,WWW.PUDHARI.NEWS

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बनावट वाहन क्रमांकाची प्लेट लावून व्यावसायिक वाहन वापरणाऱ्याविरोधात गुन्हे दाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. पोलिसांनी वाहन जप्त केले असून वाहन चालकाविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक उपनिरीक्षक सुगन साबरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने ही कारवाई केली. म्हसरुळ येथील पुष्कराज अपार्टमेंट येथे उभ्या असलेल्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यावर एमएच १५ एचएच ४९९८ क्रमांकाची नंबर प्लेट होती. मात्र पोलिसांनी सखोल तपास केला असता त्या वाहनाचा क्रमांक टीएन २२ डीए ५०१४ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वाहन मालक अक्षय शंकर लामखेडे (रा. चेन्नई) याच्याविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

The post बनावट नंबर प्लेट लावून पिकअपचा वापर, चालकाविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.