बाईक रॅलीतुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

मनसे रॅली pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमध्ये आपला १८ वा वर्धापन दिन साजरा करताना सकाळी नाशिकरोड ते दादासाहेब सभागृह अशी बाईक रॅलीतून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

अध्यक्ष राज ठाकरे हे अमित ठाकरेसह गत दोन दिवसांपासुन नाशिकमध्ये दाखल झालेले होते. आज सकाळी वर्धापनदिनाचा कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी रॅली काढण्यात आली. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन रॅलीला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, बिटको चौक, दत्तमंदिर चौक, बोधले नगर, काठे गल्ली, दादासाहेब गायकवाड सभागृहापर्यत रॅली काढण्यात आली होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत मनसेसाठी वातावरण तयार केले होते. रॅलीमध्ये महिला पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

विभागाध्यक्ष साहेबराव खर्जुल, उपजिल्हाध्यक्ष संतोष सहाणे, कामगारे सेनेचे राज्य चिटणीस प्रकाश बंटी कोरडे, सहकार विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे, उपशहराध्यक्ष भाऊसाहेब ठाकरे, विनायक पगारे, उमेश भोई, महिला विभागाध्यक्ष मीरा आवारे, शाखा अध्यक्ष प्रियंका पटेल, सविता सोनवणे, शारदा अंबाडे, रोहन देशपांडे, शहर संघटक नितीन पंडित, विजय बोराडे, वाहतुक सेना शहराध्यक्ष मयुर कुकडे, चंद्रभान ताजनपुरे, उमेश भोई, विल्सन साळवी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

मनसे रॅली pudhari.news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापनदिन शनिवार (दि.९) रोजी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. वर्धापन दिनानिमित्त  मनसेसैनिक महाराष्ट्रातून हजर झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन नाशिक यांच्यामार्फत शेकडो महाराष्ट्र सैनिकांनी देखील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत बाईक रॅलीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यामध्ये शहर चिटणीस संदीप दोंदे, शहर संघटक अर्जून वेताळ, नाशिक शहर चिटणीस देवचंद केदारे, सचिव शंकर कानकुसे, विभाग उपाध्यक्ष अनिकेत निकम, शाखाध्यक्ष संदीप मालवकर, मयूर खेडकर यांसह मनसेसैनिकांनी सिडको परिसरातून बाईक रॅली काढली होती.

The post बाईक रॅलीतुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन appeared first on पुढारी.