मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास, नाशिकच्या जागेवरुन काय म्हणाले हेमंत गोडसे?

हेमंत गोडसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाइन डेस्क; नाशिक शिवसेनेची जागा असली तरी या जागेवर भाजप, राष्ट्रवादीसह मनसेनी दावा केल्याने शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता बघावयास मिळत आहे. अशात नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी काल शेकडो कार्यकर्त्यांसह ठाणे येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी आग्रही मागणी केली.

हेमंत गोडसे यांनी मुख्यमत्र्यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भात पुढारी न्यूज शी बोलताना सांगितले की, खरेतर नाशिकची जागा ही पंरपरागत शिवसेनेची, परंतु काही दिवसांपासून राष्ट्रवादी, भाजप हे या जागेवर दावा करत होते. तसेच दोन टर्म पासून नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार आहे म्हणून ही जागा शिवसेनेसाठी सोडावी असा सर्वच पदाधिकाऱ्यांचा त्याठिकाणी आग्रह होता. आमचे हेच म्हणणे आम्ही काल मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवले. शिवसैनिकांची जी भावना आहे तीच माझीही भावना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महायुतीच्या सर्व राज्य स्तरीय नेत्यांशी चर्चा करुन ही जागा शिवसेनेला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे.

आपल्या उमेदवारीवर मित्र पक्ष नाराज असल्या संदर्भात विचारले असता गोडसे म्हणाले, श्रीकांत शिंदे यांनी त्यावेळी सर्वांचा उत्साह पाहता ही जागा धनुष्यबाणाकडेच राहील अशी औपचारिक घोषणा केली. पंरतु अधिकृत रित्या यावर चर्चा होईल, तेव्हाही ही जागा शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास आम्हाला आहे. ही जागा धनुष्यबाणासाठी सोडवून घेईल असे आश्वासन, मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे अशी प्रतिक्रीया गोडसे यांनी दिली आहे.

दरम्यान, उमेदवारी निश्चित झाल्यास गेल्या पंधरा वर्षात जनतेचे प्रश्न सोडवले आहेत संपर्क ठेवला आहे. प्रत्येक क्षेत्रात विकास कामे केली आहे. नाशिकची जनता सुज्ञ आहे. त्यामुळे केललं काम व मोदी साहेबांवरील विश्वास पाहता चांगल्या मताधिक्यांनी ही जागा शिवसेना जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –

The post मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास, नाशिकच्या जागेवरुन काय म्हणाले हेमंत गोडसे? appeared first on पुढारी.