नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी विजयी मशाल पेटवली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी दिंडोरीत तुतारीचा निनाद करून जायंट किलरचा किताब मिळवला आहे.
भास्कर भगरे विजयी घोषित
डॉ. भारती पवार (महायुती) – 464140
भास्कर भगरे (महाविकास आघाडी) – 577339
बाबू भगरे (अपक्ष) – 103632
नोटा – 8246
तब्बल 1,13,199 मतांनी आघाडी घेत भास्कर भगरे विजयी
राजभाऊ वाजे विजयी घोषित
हेमंत गोडसे ( महायुती ) – 453414
राजभाऊ वाजे ( महाविकास आघाडी ) – 614517
शांतिगिरी महाराज ( अपक्ष ) – 44415
करण गायकर ( वंचित ) – 46500
1,61, 103 मतांनी आघाडी घेत राजभाऊ वाजे विजयी झाले आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा दिंडोरीत धक्कादायक पराभव झाला आहे. कांदा प्रश्न भारती पवारांना भोवल्याची चर्चा आहे. तर हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या हेमंत गोडसे यांना जनतेने नाकारले आहे.
जनतेकडून आसली -नकलीचा फैसला
माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय हे नाशिककर जनता आणि महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांना आहे. नाशिकच्या जनतेने असली शिवसेना आणि नकली शिवसेनेचा फैसला करून दिलेला आहे. माझा विजय निश्चित होता याची मला खात्री होती. नाशिककरांच्या मदतीने आज मी मोठी लढाई जिंकली आहे. आता माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे .माझ्या विजयासाठी सिन्नरच्या जनतेने संपूर्ण मतदारसंघात प्रचार करून मला विजयापर्यंत पोहोचवले आहे .आजचा आनंद उत्सव साजरा केल्यानंतर उद्यापासून मी नाशिककरांच्या सेवेसाठी हजर राहणार आहे अशी प्रतिक्रीया राजाभाऊ वाजे यांनी दिली.