ब्रेकिंग! शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलल्या

केंद्रीय निवडणूक आयोग

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या २ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. निवडणूक आयोगाने ८ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यात मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश होता. या ४ जागांसाठी १० जूनला मतदान आणि १३ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने याआधी जाहीर केले होते. पण आता या निवडणुकी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.