भयानक! चुंचाळेत भांडणातून त्याचा तिच्यावर ॲसिडहल्ला

सिडको, नाशिक : मागील भांडणाचा राग मनात धरून महिलेवर ॲसिड फेकून गंभीर दुखापत केल्याची घटना चुंचाळे परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगला सुनील ठोके (४५, रा घरकुल योजना, चुंचाळे अंबड) यांचे व संशयित आरोपी मधू पहेलवान यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. तो राग मनात धरून पहेलवानने सोमवारी (दि.२०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ठोके यांच्यावर ॲसिडहल्ला केला. यात महिलेला दुखापत झाली असून, याप्रकरणी पहेलवानवर चुंचाळे पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: