भाजपकडून कुठलेही प्रपोजल नाही, दमानियांना कुठून कळलं?

दमानिया भुजबळ www.pudhari.news

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व छगन भुजबळ यांच्यातील वाद तसा काही नवीन नाही. आता पुन्हा दमानिया यांनी भुजबळांवर ‘एक्स’ पोस्ट करुन निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या X खात्यावर पोस्ट करुन छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे. त्यात त्यांनी भाजपवर टीका केली असून एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप अशी टीका केली आहे. 

यासंदर्भात मंत्री भुजबळांना विचारले असता, भुजबळ म्हणाले की, मला अजुन काही माहिती नाही. त्यांना कशी काय माहिती मिळाली, हेही मला माहीत नाही. मात्र, मला कुठल्याही पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही, असे काही प्रपोजल मला भाजपकडून आले नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post भाजपकडून कुठलेही प्रपोजल नाही, दमानियांना कुठून कळलं? appeared first on पुढारी.