नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. भारती पवार या निवडणूक रिंगणात आहेत. नाशिक लोकसभेतून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे व दिंडोरीत भाजपच्या भारती पवार हे दोघेही महायुतीचे उमेदवार आज (दि.2) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे, जी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती पवार यांच्या अडचणीत वाढ करणारी आहे. (Lok Sabha Election 2024 )
विद्यमान खासदार भारती पवारांना भाजपकडून दिंडोरीत पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज असलेले भाजप नेते व माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरीची तयारी केली आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या बंडोखोरीवर शिक्का मोर्तब झाल्याचे बोलले जात असून ते अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे समजते. ते आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. चव्हाण यांच्या बंडखोरीमुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. (Lok Sabha Election 2024 )
कोण आहेत हरिश्चंद्र चव्हाण? Lok Sabha Election 2024
हरिश्चंद्र चव्हाण हे दोन वेळा दिंरोडीचे खासदार राहिलेले आहेत. 2019 साली चव्हाण हॅटट्रीक करतील अशी अपेक्षा असताना भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली होती. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली होती. 2014 मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांनीच भारती पवार यांचा दारुण पराभव केला होता. आता हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने भारती पवारांच्या अडचणी वाढतील असे दिसते आहे.
हेही वाचा –