नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यामध्ये जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर शाब्दीक चकमक झाली. माजी आमदार वसंत गीते व भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे हे समोरासमोर आल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने मतदारांची गर्दी झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते जुने नाशिक परिसरात समोरासमोर आले असताना वाजे गट उद्धव ठाकरे शिवसेना व शिंदे सेना गट आणि भाजपाचे कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली होती. परिस्थिती तणावग्रस्त झाल्याने पोलीसांनी मध्यस्थी करत मतदान केंद्रावरील वातावरण सुरळीत केले.
मतदान केंद्रावर आजी माजी आमदारात शाब्दीक चकमक
- Post author:Anjali Raut
- Post published:May 20, 2024
- Post category:June Nashik / Lok Sabha Election 2024 / Nashik Lok Sabha Election 2024 / उत्तर महाराष्ट्र / महाराष्ट्र
Tags: नाशिक